गणेश लहामगे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST2021-03-18T04:19:56+5:302021-03-18T04:19:56+5:30

सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहाय्यक फौजदार प्रकाश निमसे, पो.हे.कॉ. कैलास नेहे, पोलीस ...

Ganesh Lahamge was remanded in police custody for three days | गणेश लहामगे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी

गणेश लहामगे यास तीन दिवसाची पोलीस कोठडी

सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहाय्यक फौजदार प्रकाश निमसे, पो.हे.कॉ. कैलास नेहे, पोलीस नाईक विजय मुंढे आदींच्या पथकाने सोमवारी रात्री राजूर येथे गणेश लहामगे याच्या घरी छापा टाकला होता.

यात पोलिसांना त्याच्या घरातील एका खोलीत व गोठ्यात ठेवण्यात आलेल्या एकूण ३ लाख ७७ हजार ४५० रुपये किमतीचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात १६२ घरगुती सिलेंडर आढळून आले होते. पोलिसांनी मुद्देमालासह लहामगे यास अटक केली होती. त्यास बुधवारी अकोले येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गॅस टाक्या कोठून उपलब्ध झाल्या असल्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक खैरनार यांनी सांगितले.

Web Title: Ganesh Lahamge was remanded in police custody for three days