नगरकरांसाठी कुंदनवर्कच्या गणेश मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 12:50 IST2017-08-22T12:47:11+5:302017-08-22T12:50:35+5:30
गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मूर्ती तयार करण्यास वेग आला आहे. कलाकार मूर्तीच्या रंगरंगोटीत मग्न झाले आहेत.

नगरकरांसाठी कुंदनवर्कच्या गणेश मूर्ती
ठळक मुद्देलालबागचा राजा, मयुरासन, मूषकराज, महाराजा आदि विविध प्रकारच्या गणेशमूर्ती दरात १५ ते २० टक्के वाढ
नगरकरांसाठी कुंदनवर्कच्या गणेश मूर्ती
अहमदनगर : गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मूर्ती तयार करण्यास वेग आला आहे. कलाकार मूर्तीच्या रंगरंगोटीत मग्न झाले आहेत. लालबागचा राजा, मयुरासन, मूषकराज, महाराजा आदि विविध प्रकारच्या गणेशमूर्ती नेहमी प्रमाणे उपलब्ध आहेत. नगरकरांसाठी हजारो आकर्षक गणेश मूर्तींची तयार करण्यात आल्या आहेत. यंदा हातांनी सजविलेल्या कुंदन वर्कच्या गणेश मूर्ती नगरकरांसाठी तयार केल्या आहेत. टिकल्या रंगीत खडे, पट्ट्या,चेन यांचा आकर्षक वापर करून सुंदर मुर्त्या तयार केल्या आहेत . जीएसटीमुळे मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्के वाढ होणार आहे.