काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात गांधीगिरी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 13:37 IST2021-02-17T13:37:16+5:302021-02-17T13:37:57+5:30
कोपरगाव तालुक्यासह शहर कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी ( दि.१७ ) शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात गांधीगिरी आंदोलन
कोपरगाव : तालुक्यासह शहर कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी ( दि.१७ ) शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पेट्रोल प्रतिलिटर शंभरी गाठत असल्याने गुलाबपुष्प तसेच लाडू भरवून पंपावर स्वागत करीत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ग्राहकांनी भाववाढीवर नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्य जगायचे तरी कसे? अशा भावना व्यक्त केल्या.