लॉकडाऊनमध्ये घरातच सुरू केला जुगाराचा अड्डा; अकरा जुगा-यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:13 IST2020-05-09T16:12:59+5:302020-05-09T16:13:36+5:30

केडगाव येथील जयहिंद कॉलनी येथे एकाने पैसे कमविण्यासाठी स्वत:च्या घरातच जुगाराचा अड्डा सुरू केला. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी या ठिकाणी छापा टाकून मालकासह ११ जणांना ताब्यात घेतले.

Gambling den started at home in Lockdown; Eleven Jugas arrested | लॉकडाऊनमध्ये घरातच सुरू केला जुगाराचा अड्डा; अकरा जुगा-यांना अटक

लॉकडाऊनमध्ये घरातच सुरू केला जुगाराचा अड्डा; अकरा जुगा-यांना अटक

अहमदनगर : केडगाव येथील जयहिंद कॉलनी येथे एकाने पैसे कमविण्यासाठी स्वत:च्या घरातच जुगाराचा अड्डा सुरू केला. कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी या ठिकाणी छापा टाकून मालकासह ११ जणांना ताब्यात घेतले.
विजय जगन्नाथ घास असे अटक केलेल्या जुगार अड्डा चालकाचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी घास याच्यासह हरिदास यादव शिंदे, सचिन सोन्याबापू डावखरे, प्रवीण बापूसाहेब सातपुते, सागर चंद्रकांत जंगम, गिरीश राजेंद्र शर्मा, सुरेश कुंडलिक खंबायत, रशिद पीरमहमद शेख, मनोज महादेव पुलावळे, संतोष अरुण पवार, यशवंत एकनाथ बदलावाले यांना ताब्यात घेतले. यावेळी दहा मोबाईल फोन, पत्ते, रोख रक्कम व एक मोटारसायकल असा एकूण १ लाख ९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, सुजय हिवाळे, भारत इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Gambling den started at home in Lockdown; Eleven Jugas arrested