पदवी नसताना रुग्णांची तपासणी करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:01+5:302021-04-29T04:16:01+5:30

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. २८) संगमनेर ...

Gajaad examining patients without a degree | पदवी नसताना रुग्णांची तपासणी करणारा गजाआड

पदवी नसताना रुग्णांची तपासणी करणारा गजाआड

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हे कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. २८) संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना निमगाव भोजापूर येथे एक व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समजले. त्यांनी तेथे जात सखोल चौकशी केली असता त्याचे नाव शैलेश कडलग असल्याचे समोर आले. याबाबत डॉ. मंगरुळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांना कळवत संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कडलगविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. एस. पाटोळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gajaad examining patients without a degree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.