गडाख-मुरकुटे एकाच नाण्याच्या दोन बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:49+5:302021-07-14T04:23:49+5:30
सोनई : राजकीय स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व मंत्री शंकरराव गडाख हे एकाच नाण्याच्या दोन ...

गडाख-मुरकुटे एकाच नाण्याच्या दोन बाजू
सोनई : राजकीय स्वार्थासाठी जनतेला वाऱ्यावर सोडणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व मंत्री शंकरराव गडाख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका नुकतेच भाजपतून बाहेर पडलेले प्रकाश शेटे यांनी केली.
शेटे म्हणाले, मागील आमदारकीमध्ये घुले पाटलांनी मला निवडून आणले म्हणून त्यांच्या कारखान्याची निवडणूक त्यांनी (मुरकुटे) केली नाही? तेव्हा यांना उसाच्या भावाची चिंता नव्हती का? गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजप असताना शिंगणापूरची चौकशी केली. त्यावेळेस सर्व सत्ता यांच्या ताब्यात असताना शिंगणापूर देवस्थान गडाखांच्या ताब्यात कुणी दिले? अंधारात कुणी काय तडजोड केली हे सर्व तालुक्याला माहीत आहे, अशी टीका शेटे यांनी केली.
ज्या लोकांनी सर्व विसरून तुम्हाला मतदान केले त्या अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना कशी वागणूक मिळाली हे काय लपणारा विषय नाही? जिल्हा परिषद, पंचायत समितीत निष्ठावंतांना, तुम्हाला मदत केलेल्या लोकांना जाणीवपूर्वक डावलले. लोकांना सांगायचे विरोधक भ्रष्टाचार करतात? मग स्वतःचे नातेवाईक ४ एकरवरून १०० एकरवर कसे गेले? जिल्हा बँकेच्या वेळेस कोणाच्या कृपेने नामदार शंकरराव गडाख हे बिनविरोध निवडून गेले हे लोकांना कळते? लोक दुधखुळे नाहीत. मग तडजोड नसेल का? म्हणजे कोणीही असो लोकांना कळते सर्व कोण कसे वागतो? असे म्हणत गडाख व मुरकुटे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका शेटे यांनी केली.