अंत्यविधी करणा-यांचा विमा उतरवून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:36+5:302021-06-04T04:17:36+5:30
कोविड काळात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईकही त्याच्या जवळ जात नाहीत. नगरपंचायतने अंत्यविधीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी मात्र एखाद्या कुटुंबातील ...

अंत्यविधी करणा-यांचा विमा उतरवून सत्कार
कोविड काळात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईकही त्याच्या जवळ जात नाहीत. नगरपंचायतने अंत्यविधीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी मात्र एखाद्या कुटुंबातील घटकांप्रमाणे अंत्यसंस्काराचे विधी पार पाडत आहेत.
आकाश शेजवळ, दीपक हिवाळे, सागर कुऱ्हाडे, परमेश्वर देवरे, रवी लोंढे व रावसाहेब पवार हे कर्मचारी शिर्डीतील अमरधाममध्ये कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करत आहेत. गेल्या दोन महिन्यात जवळपास तीनशे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व अखंड हरिनाम सप्ताह कमेटी, शिर्डी-साकुरी शिवचे पदाधिकारी दत्ता आसने यांच्या पुढाकारातून या कर्मचा-यांचा १ लाखाचा अपघात विमा उतरवून तसेच कोविड योद्धा सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कीर्तनकार दत्ता महाराज वैद्य निफाडकर, योगेश चौधरी, सचिन हनवते, रामेश्वर इंगळे़, नवनाथ आसने, धृपद तांबे, विलास लासुरे आदींची उपस्थिती होती.
...........
शिर्डीच नव्हे तर तालुक्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्य आहे. मात्र त्यांच्याविषयी ऋतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा विमा उतरवून सत्कार केला आहे.
- दत्ता आसने, सामाजिक कार्यकर्ता-