विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:10+5:302021-02-08T04:18:10+5:30

अळकुटी : पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी परिसरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली. ...

Funding for development work will not be reduced | विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

अळकुटी : पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी परिसरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.

अळकुटी (ता. पारनेर) येथील बहिरोबावाडी येथील शिंदे मळा, भुडकी मळा बंधाऱ्याचे जलपूजन लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

लंके यांनी यावेळी उपसरपंच मधुकर जाधव, किसन शिंदे यांचे कौतुक केले.

यावेळी सरपंच बाबाजी भंडारी, उपसरपंच मधुकर जाधव, किसन शिंदे, बाळासाहेब पुंडे, तुळशीराम शिरोळे, संपत महाराज शिरोळे, शशिकांत कनिंगध्वज, अळकुटी ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष महेश शिरोळे, प्रभू जाधव, काॅन्ट्रॅक्टर अम्रता रसाळ, सावळा पानंमद, किरण डेरे, माजी उपसरपंच संतोष काटे, माजी सरपंच संदेश कापसे, भाऊ शिंदे, बंटी दाते, आनंद नरड, बाजीराव शिरोळे, झुंबर शिरोळे, बाबाजी शिंदे, बन्सी फुले, बाळासाहेब शिंदे, रामदास शिंन्दे, अंकुश जाधव, बाबाजी जाधव, अमोल नरड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव भुजबळ यांनी केले. किसन शिंदे यांनी आभार मानले.

फोटो : ०७ अळकुटी

पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी येथे बंधाऱ्याच्या जलपूजनप्रसंगी आमदार नीलेश लंके व इतर.

Web Title: Funding for development work will not be reduced