रवींद्र भापकर यांनी एक वर्ष उपसभापती म्हणून कार्य करताना तालुक्यातील अनेक गावात भरीव निधी दिला आहे. आगडगाव येथील भैरवनाथांचे देवस्थान जिल्ह्यात नावारूपास येत आहे. त्यासाठी निधी देण्याचा निर्णय भापकर यांनी घेतला. त्यांच्या निधीतून नुकतेच कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भगत, आगडगावचे सरपंच मच्छिद्र कराळे, उपसरपंच संतोष शिरसाठ, ग्रामसेवक पोपट गावडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, विश्वस्त नितीन कराळे, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद खाडे, दीपक गुगळे, बाबासाहेब बोरुडे, दिलीप गायकवाड, संभाजी कराळे, डॉ. जाधव, भाऊसाहेब पालवे आदी उपस्थित होते.
आगडगाव देवस्थानसाठी ५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST