नगरपंचायत समिती इमारतीसाठी दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:17 IST2021-04-03T04:17:01+5:302021-04-03T04:17:01+5:30
केडगाव : नगर तालुका पंचायत समितीमध्ये जागा अपुरी असल्यामुळे येथील विभाग दोन-तीन ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सर्व विभाग पंचायत ...

नगरपंचायत समिती इमारतीसाठी दोन कोटींचा निधी
केडगाव : नगर तालुका पंचायत समितीमध्ये जागा अपुरी असल्यामुळे येथील विभाग दोन-तीन ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सर्व विभाग पंचायत समितीच्या आवारात आणणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून पंचायत समितीचा दुसरा मजला करण्यासाठी देणार आहे, असे जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी सांगितले.
पंचायत समितीच्या नूतन सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ.दिलीस पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर, नगरसेवक योगीराज गाडे, गटविकास अधिकारी सचिन धाडगे, माजी पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, रवींंद्र भापकर, व्ही.डी. काळे, गुलाब शिंदे, प्रकाश कुलट, निसार पठाण, चंद्रकांत खाडे, संदीप गुंड उपस्थित होते.
सभापती सुरेखा गुंड म्हणाल्या, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जातील.
पंचायत समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात असल्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. डॉ.दिलीप पवार म्हणाले, कोरोना असला, तरी तुमच्या अडचणी सोडविल्या जातील. नगरला कार्यालयात येण्याची गरज पडणार नाही. दूरध्वनीमार्फत नागरिकांनी आपल्या अडचणी सांगितल्या, तरी चालेल. कमी कालावधी असला, तरी जास्तीतजास्त नागरिकांचे प्रश्न पंचायत समितीच्या माध्यमातून सोडविले जातील.
--
०२ नगरपंचायत समिती
नगरपंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीपदाचा पदभार नव्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच स्वीकारला. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.