बेग टोळीतील फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST2021-04-13T04:19:25+5:302021-04-13T04:19:25+5:30

नाशिक येथील गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी शहरातील लोणी परिसरात ही कारवाई केली. नाशिक शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात ...

Fugitive accused in Beg gang arrested | बेग टोळीतील फरार आरोपीला अटक

बेग टोळीतील फरार आरोपीला अटक

नाशिक येथील गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी शहरातील लोणी परिसरात ही कारवाई केली. नाशिक शहरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी पकडले. सय्यद याने तेथे सोनसाखळी चोरीचे अकरा गुन्हे केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. त्याच्याकडून ७ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात १४५ ग्रॅम सोने व दुचाकी यांचा समावेश आहे. त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे.

आरोपी सय्यद याच्यावर श्रीरामपुरात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. दरम्यान, सय्यद हा नाशिकमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोनसाखळीचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सय्यद याच्या माध्यमातून सोनसाखळी चोरीतील मोठी टोळी पकडली जाण्याची शक्यता आहे.

---------

Web Title: Fugitive accused in Beg gang arrested