आरक्षणासाठी मोर्चा, मंत्र्यांचा निषेध

By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:29:06+5:302014-07-29T01:04:39+5:30

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याला व आरक्षणाला विरोध करणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांच्या निषेधार्थ

Front for reservation, protest of ministers | आरक्षणासाठी मोर्चा, मंत्र्यांचा निषेध

आरक्षणासाठी मोर्चा, मंत्र्यांचा निषेध

अहमदनगर : धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याला व आरक्षणाला विरोध करणाऱ्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांच्या निषेधार्थ व आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली़
श्रीगोंद्यात मोर्चा
श्रीगोंदा : तहसील कार्यालयावर धनगर समाजाने निषेध मोर्चा काढून धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू असा इशारा देण्यात आला़ धनगर आरक्षणाला व धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी मंत्री मधुकर पिचड, पद्माकर वळवी, वसंत पुरके या नेत्यांनी विरोध केल्याचा आरोप धनगर समाजाच्या नेत्यांनी केला़ तसेच आघाडी सरकारचा निषेध करुन आरक्षणाची मागणी केली़ यावेळी श्रीगोंदा कारखान्याचे संचालक आबासाहेब कोल्हटकर, साईकृपा कारखान्याचे अध्यक्ष सदाअण्णा पाचपुते, बबनराव मदने, अ‍ॅड़ रंगनाथ विबे, भाऊसाहेब कोळपे, शहाजी कोरडकर, युवराज चितळकर, दत्तात्रय गावडे, ज्ञानदेव गवते, संतोष धायगुडे, सुनील खरात आदी उपस्थित होते़
कर्जतमध्ये निषेध
कर्जत : धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही तर चक्काजाम आंदोलन करु, असा इशारा सोमवारी (दि. २८) रोजी कर्जत येथे आंदोलकांनी दिला. यावेळी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांचा निषेध करण्यात आला.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बारामती येथे उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी कर्जत तालुक्यातील धनगर समाजाने तहसील कार्यालयावर मेंढरांसह भव्य मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात सावता माळी मंदिरापासून झाली. या मोर्चात मेंढ्यांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करुन चक्काजाम करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी धनगर समाजाचे नेते धनराज कोपनर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, सेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, रासपचे जिल्हाध्यक्ष भानुदास हाके, महासंग्रामचे तालुकाध्यक्ष भारत मासाळ, डॉ. इंद्रकुमार भिसे, धालवडीचे अध्यक्ष विजय पावणे, अंगद रुपनर, विष्णू देमुंडे आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
शेवगाव : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने सोमवारी (दि़२८) नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घाडगे यांना निवेदन देण्यात आले़ या आरक्षणबाबत त्वरीत निर्णय न घेतल्यास मेंढ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला़ निवेदनावर बापुराव राशिनकर, जगन्नाथ गावडे, ज्ञानेश्वर राशिनकर, नानासाहेब उगले, दत्तात्रय नजन, लक्ष्मण भिसे, शेषराव कर्डिले, छबुराव मिसाळ, भाऊसाहेब कोल्हे, गोपीनाथ चोरमले, नाना कर्डिले आदींच्या सह्या आहेत़ (प्रतिनिधी)
समर्पणचा पाठिंबा
नेवासा : धनगर समाजाच्या आरक्षणाला समर्पण फाऊंडेशनच्या वतीने पाठिंबा देण्यात आला़ तहसीलदार हेमलता बडे यांना या पाठिंब्याचे पत्र देऊन आरक्षणाची मागणी करण्यात आली़ धनगर समाज आरक्षण कृती समितीलाही पाठिंब्याचे पत्र देण्यात आले़
कर्डिलेंची टीका
धनगर समाजाला राज्यशासनाने तात्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करतानाच राज्य सरकारातील काही मंत्रीच या आरक्षणाला थेट विरोध करीत आहे़ धनगर समाजाला आरक्षण देण्यास राष्ट्रवादीचा प्रखर विरोध असल्याची टीका आ. शिवाजी कर्डिले यांनी करंजी (ता़ पाथर्डी) येथे एका कार्यक्रमात बोलताना केली़

Web Title: Front for reservation, protest of ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.