आरक्षणासाठी मोर्चा

By Admin | Updated: September 2, 2014 01:25 IST2014-09-02T01:25:58+5:302014-09-02T01:25:58+5:30

शेवगाव : धनगर समाजला आरक्षण मिळावे, यासाठी काळ्या फिती लावून आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला़

Front for reservation | आरक्षणासाठी मोर्चा

आरक्षणासाठी मोर्चा


शेवगाव : धनगर समाजला आरक्षण मिळावे, यासाठी काळ्या फिती लावून आंबेडकर चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला़
तहसील कार्यालयात या मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले़ बापुसाहेब राशीनकर व जगन्नाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात समाजातील तरूण व वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले़ बाबुसाहेब राशीनकर, जगन्नाथ गावडे, अशोक चोरमारे बाजीराव लेंडाळ, दातीर, पाराजी शिंदे यांनी मोर्चास संबोधीत केले़ यावेळी कारभारी विर, छबुराव मिसाळ, गणेश कोरडे, रामनाथ लेंडाळ, ज्ञानेश्वर पांढरे, गोरख राशीनकर, गोरख कर्डीले, बाबासाहेब कोरडे आदी उपस्थित होते़ तहसिलदार हरिश सोनार यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले़
नेवासा : नेवासा येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला़
तहसीलदार कोरडे यांना निवेदन देऊन धनगर समाजाला आदीवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली़ यावेळी धनगर समाजाचे नेते शशीकांत मतकर, अशोक कोळेकर, भाऊसाहेब गायके, साहेबराव देवकाते, किशोर विखे, सहदेव लोंढे, विठ्ठल लोंढे, राजहंस मंडलिक, एकनाथ धनापुणे, डॉ़ पंडीत, डॉ़ नजन, बाबासाहेब लोंढे, ठकाजी बाचकर आदी उपस्थित होते़
श्रीगोंद्यात निषेध
श्रीगोंदा : आघाडी शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत विरोधी भूमिका घेतल्याचा तहसिलदार डॉ़ विनोद भामरे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला़ श्रीगोंदा तालुका धनगर समाज कृती समितीचे आबासाहेब कोल्हटकर, भाऊसाहेब कोळपे, अ‍ॅड. रंगनाथ बिबे, आप्पा धायगुडे, शिवाजी कोल्हटकर, बबन मदने, नवनाथ राहिंज यांनी निवेदनाद्वारे निषेध नोंदविला़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Front for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.