गुंडेगाव येथे मोफत नेत्र तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:18 IST2021-02-08T04:18:12+5:302021-02-08T04:18:12+5:30

केडगाव : आनंदॠषीजी नेत्रालय नगर व स्मार्ट व्हिलेज अभियान गुंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प ...

Free eye check up at Gundegaon | गुंडेगाव येथे मोफत नेत्र तपासणी

गुंडेगाव येथे मोफत नेत्र तपासणी

केडगाव : आनंदॠषीजी नेत्रालय नगर व स्मार्ट व्हिलेज अभियान गुंडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच गुंडेगाव येथे आयोजित केले होते. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबिर वरदान ठरले असून गुंडेगावातील अनेक ग्रामस्थांनी डोळे तपासणी करून चष्मे वाटप करण्यात आले.

मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया मोफत करण्यात आले आहे, यामध्ये अनेक वृद्ध लोकांनी सहभाग नोंदवला व शंभराहून अनेक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराचे आयोजन स्वप्नील गव्हाणे व आर्यन कराळे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माजी उपसंरपच मंगेश हराळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकार संजय भापकर, सतीश चौधरी, एकनाथ कासार, भवानी प्रसाद, चुंबळकर मेजर, डॉ. विलास सकट, शेखर हराळ, तुकाराम भापकर, रामकृष्ण कुताळ, शिर्के, रामदास जावळे आदी उपस्थित होते.

Web Title: Free eye check up at Gundegaon