बनावट दस्तावेज तयार करून केली सैन्य दलाची फसवणूक; शैक्षणिक संस्थाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 11:27 IST2021-09-09T11:26:41+5:302021-09-09T11:27:09+5:30

पोलिस-लष्कराची कारवाई 

Fraud of the military by forging documents; Filing a crime against an educational institution in ahmadnagar | बनावट दस्तावेज तयार करून केली सैन्य दलाची फसवणूक; शैक्षणिक संस्थाविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट दस्तावेज तयार करून केली सैन्य दलाची फसवणूक; शैक्षणिक संस्थाविरुद्ध गुन्हा दाखल

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सैन्यदलातील नोकरीसाठी बनावट दाखले तयार करून सैन्य दलाची फसवणूक करणा-या पाथर्डीतील शैक्षणिक संस्थाविरुद्ध पोलिस व नाशिक येथील मिलिटरी इन्टिलिजन्सने संयुक्त कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.  

शहरातील नाथनगरमध्ये मारुती शिरसाठ व त्याचे काही साथीदार हे बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने काही युवक सरकारी व सैन्यदलात नोकऱ्या हस्तगत करीत असल्याच्या माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व मिलिटरी इंटेलीजेंस देवळाली कॅम्प (नाशिक) यांनी केलेल्या  संयुक्त कारवाईत ४ आरोपी,  बनावट शाळेची कागदपत्र तयार करून त्या मोबदल्यात पैसे स्वीकारून ते देण्याचे काम करत आढळून आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छापा घातलेल्या ठिकाणी बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज व त्या लागणारे साहित्य मिळून आले. संत भगवानवावा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालय अकोला( ता.पाथर्डी), संत भगवानबाबा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय घाटशिळ  पारगांव (ता. शिरूर कासार जिल्हा बीड) , श्री नागनाथ विद्यालय पिंपळगांव (टप्पा) (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर),  जि. प. प्राथमिक शाळा चिंचपुर इजदे (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी (ता.पाथर्डी जि.अहमदनगर)  या विद्यालयाचे दाखले व बनावट शिक्के व साहित्य आढळून आले.

आरोपी मारुती आनंदराव शिरसाठ यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता दत्तू नवनाथ गर्जे (रा. अकोला ता. पाथर्डी),  २) कुंडलिक दगडू जायभाये (रा. अनपटवाडी( ता. पाटोदा जि. बीड),  ३) मच्छिंद्र कदम रा. मानुर( ता.  शिरूर कासार, जि. बीड ) यांनी संगनमताने एकत्र येवून तयार केल्याचे समजले. यापूर्वी आरोपी अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा.वाडीवरे ता. इगतपुरी जि. नाशिक) , शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद ता. जि. नाशिक)  यांना सैन्यदलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला बनवून दिला असल्याचे सांगितले.

दिलेल्या दाखल्यामध्ये त्यांचे नाव व जन्म दिनांकामध्ये बदल करून बनावट दाखला दिला असल्याचे निष्पन्न झाले.  आरोपी नामे १) मारुती आनंदराव शिरसाठ (वय ५२ रा. जांभळी ता. पाथर्डी ) , २) दत्तु नवनाथ गर्जे (वय ४० रा. अकोला ता. पाथर्डी)  ३) कुंडलिक दगडु जायभाये (रा.अनपटवाडी ता.पाटोदा जि. बीड) ४) मच्छिंद्र कदम (रा. मानूर ता शिरूर कासार, जि. बीड)  ५) अजय उर्फ जय राजाराम टिळे (रा. वाडीवरे ता इगतपुरी जि. नाशिक) , ६)शांताराम पंढरीनाथ अनार्थे (रा. पिंपळद ता.जि.नाशिक) यांनी एकत्र येवून संगणमताने कट करून शासनाची फसवणुक करण्याचे उददेशाने बनावट दस्तऐवज तयार करून तो खरा आहे असा भासवून त्याचा शासकीय कामाकरीता गैरवापर करून सैन्यदलामध्ये नोकरी मिळवून शासनाची फसवणुक केल्या बाबत आज पहाटे भा.द.वि.क. ४२०, १२०३, ४६७, ४६७, ४६८, ४७१, प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Fraud of the military by forging documents; Filing a crime against an educational institution in ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.