ऊस उत्पादन वाढीसाठी कोल्हे कारखाना प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:18+5:302021-09-17T04:26:18+5:30
कोपरगाव : सहकारमहर्षी कोल्हे कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन योजना आणून त्याची संपूर्ण माहिती थेट सभासदांच्या ...

ऊस उत्पादन वाढीसाठी कोल्हे कारखाना प्रयत्नशील
कोपरगाव : सहकारमहर्षी कोल्हे कारखाना सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन योजना आणून त्याची संपूर्ण माहिती थेट सभासदांच्या बांधावर देऊन त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा यथोचित सन्मान होत असतो, असे सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सांगितले.
कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा प्रशस्तीपत्रक, शाल व फेटा बांधून कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते कार्यस्थळावर कोरोना नियम पाळत सत्कार करण्यात आला. यावेळी उसाच्या २०-२१ या हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील भास्कर भीमराज शिंदे यांच्याकडे अवघे पाच एकर शेती क्षेत्र असतानाही त्यांनी आडसाली को -८६०३२ उसाचे सर्वाधिक विक्रमी ९३ मे. टन, करंजी येथील रामदास केशव बोठे यांनी आडसाली एकरी ९०.११ मे टन, सोनेवाडी येथील भाऊसाहेब देवराम गुडघे यांनी पूर्वहंगामी ८३.८८ मे टन, पिंपळगाव जलाल येथील भिका लक्ष्मण नरोडे यांनी सुरू एकरी ५५.०८ मे टन, तर मढी खुर्द येथील भाऊसाहेब सूर्यभान गायकवाड यांनी को-एम १०००१ खोडवा वाणाचे एकरी ६१.८५ मे टन उसाचे उत्पादन घेतले. त्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे, संचालक विवेक कोल्हे, फकीर बोरणारे, भास्कर भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजी वक्ते, अरुण येवले, अशोक औताडे, सोपान पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगीता नरोडे, सोनुबाई भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे, प्रकाश डुंबरे, तुळशीराम कानवडे, गोरखनाथ शिंदे, शिवाजी देवकर उपस्थित होते. उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.
..............
फोटो ओळी
सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा प्रशस्तीपत्रक, शाल, फेटा बांधून अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-------
फोटो१६- सभासद सत्कार - कोपरगाव
--