चार वर्षीय मुलीचा खून
By Admin | Updated: August 23, 2014 00:43 IST2014-08-22T23:36:03+5:302014-08-23T00:43:12+5:30
कोपरगाव : कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका चार वर्षीय मुलीचा आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली़

चार वर्षीय मुलीचा खून
कोपरगाव : कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीत एका चार वर्षीय मुलीचा आपटून खून केल्याची घटना तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी सकाळी घडली़ या प्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरुन मुलीच्या बापासह, आजोबा व इतर आठ जणांविरुद्ध कोपरगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पढेगावच्या ४५ चारी येथे राहणाऱ्या भोसले कुटुंबात जलीता विष्णू चव्हाण यांच्याकडून घेतलेल्या उसन्या पैशांवरुन वाद सुरु होते़ हे वाद शुक्रवारी सकाळी विकोपाला गेले़ चव्हाण यांच्या उसन्या पैशावरुन भोसले कुटुंबात गज काठ्यांनी मारहाण झाली़ यावेळी लक्ष्मी भागवत भोसले भांडण सोडविण्यासाठी गेल्या़ त्यांनाही मारहाण झाली़ त्यांची चार वर्षाची मुलगी सायली भागवत भोसले तेथे आली़ तिलाही बेदम मारहाण करण्यात आली़
सायली हिला एकाने उचलून खाली आपटले़ त्यामुळे सायलीच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाला़ सायलीला उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले़ परंतु तेथे डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले़
या प्रकरणी लक्ष्मी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नवरा भागवत भारम भोसले, सासरा भारम हवालदार भोसले, भगवान बडोद भोसले, सुरेश बडोद भोसले, दगु बडोद भोसले, भगीरथ बडोद भोसले, शाम बडोद भोसले, नामदेव बडोद भोसले, करुणाबाई बडोद भोसले, चांगदेव भारम भोसले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार करीत आहेत़
(प्रतिनिधी)