चार दरोडेखोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 14:06 IST2019-06-26T14:06:53+5:302019-06-26T14:06:56+5:30

मंचर येथील दिनेश भवर या व्यापाऱ्याला स्वस्तात चांदीची नाणी देण्याचे आमिष दाखवून ३ लाख रूपयांना लुटल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघा दरोडेखोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

Four robbery goosehead | चार दरोडेखोर गजाआड

चार दरोडेखोर गजाआड

श्रीगोंदा : मंचर येथील दिनेश भवर या व्यापाऱ्याला स्वस्तात चांदीची नाणी देण्याचे आमिष दाखवून ३ लाख रूपयांना लुटल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघा दरोडेखोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यातील फिर्यादीने आरोपींना ओळखल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वी सांगवी दुमाला शिवारात अवघ्या दोन लाख रूपयांमध्ये पाच कोटींची चांदीची नाणी देण्याचे आमिष दाखवून दिनेश भवर यांचे रोख २ लाख रूपये तसेच १ लाख ३७ हजार रूपये किमतीचे मोबाईल व घड्याळ लंपास केले होते.
फौजदार सोमनाथ कर्णवर, काँस्टेबल अंकुश ढवळे, दादासाहेब टाके, किरण बोराडे यांनी उसात लपून बसलेला एक व इतर ठिकाणांवरून तीन आरोपींना चोवीस तासात पकडले.

वाटणीवरून दरोडेखोरात मारामा-या
आठ नऊ दरोडेखोरांनी सुमारे ३ लाखांचा ऐवज लुटला होता. समान वाटणी करण्यावरून त्यांच्या टोळीत मारामाºया झाल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Four robbery goosehead