राहुरीत पोलीस अधिका-यासह चार पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 12:52 IST2020-09-26T12:52:25+5:302020-09-26T12:52:57+5:30

राहुरी येथील पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह चार जण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. 

Four police corona positive including a police officer in Rahuri | राहुरीत पोलीस अधिका-यासह चार पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

राहुरीत पोलीस अधिका-यासह चार पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

राहुरी : येथील पोलीस ठाण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह चार जण दोन दिवसात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता पोलीस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. 

राहुरीच्या कारागृहातील ३७ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या पाठोपाठ आठ-दहा दिवसात कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी आजारी पडू लागले. चार दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले. मागील दोन दिवसात आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, एका वरिष्ठ पोलीस अधिका-याचा समावेश आहे. सध्या बारा जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

Web Title: Four police corona positive including a police officer in Rahuri