संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 14:30 IST2020-06-17T14:29:34+5:302020-06-17T14:30:14+5:30

संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी (१७ जून) प्राप्त झाला अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

Four people from Sangamner taluka contracted corona |  संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण 

 संगमनेर तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण 

संगमनेर : तालुक्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अहवाल बुधवारी (१७ जून) प्राप्त झाला अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एकाच कुटुंबातील तीन तर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी येथील एक अशा चार जणांना कोरोना लागण झाली आहे. त्यात तीन महिला व एका मुलीचा समावेश आहे. 

      निमोण येथील एकाच कुटुंबातील ३१ व ३० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगी अशा तिघांना तर गुंजाळवाडी येथील एक ५७ वर्षीय महिला अशा चार जणांचा कोरोनाची लागण झाली आहे.

 निमोण येथील कोरोनाबाधित नाशिक  जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी येथील रूग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. तर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडीत पहिल्यांदा कोरोना रूग्ण सापडला आहे. या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या इतरांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. संगमनेर तालुक्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. 

Web Title: Four people from Sangamner taluka contracted corona