दौंड - मनमाड रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीसाठी चार पॅसेंजर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:37 IST2018-04-26T18:36:49+5:302018-04-26T18:37:55+5:30
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.

दौंड - मनमाड रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीसाठी चार पॅसेंजर रद्द
श्रीरामपूर : रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुदखेड- दौंड, मुदखेड-पुणे, दौंड - नांदेड व पुणे - नांदेड या चार पॅसेंजर २५ एप्रिल ते २३ मे या एका महिन्याकरिता दुरुस्तीच्या कामासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेस्थानक प्रमुख एल.पी.सिंह यांनी दिली. वरील चार रेल्वे रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचा ताण अन्य रेल्वे व एसटी वाहतुकीवर पडणार आहे. साईनगर-पंढरपूर ही रेल्वे यापूर्वी चार महिन्यांकरिता बंद करण्यात आली होती. ती नुकतीच सुरु झाली आहे. मात्र ती आठवड्यातून अवघे तीन दिवस धावते. मुदखेड-नांदेड- दौंड(क्र.५७५१६), मुदखेड-नांदेड-पुणे(क्रमांक -५१४२२), दौंड - नांदेड (क्रमांक -५७५१५) व पुणे नांदेड-मुदखेड(क्रमांक - ५१४२१) या चार पॅसेंजरने नोकरदारवर्ग नगर व अन्य स्थानकावर दररोज प्रवास करतो. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेस्थानक प्रमुख वाणिज्य उपनिरीक्षक वाढे यांनी केले आहे.