जिल्हा बँकेतील कॅशिअरनेच चोरली चार लाखांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:09+5:302021-03-24T04:20:09+5:30
कोपरगाव : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरीस असलेल्या कॅशिअरने बँकेतील चार लाखांची रोकड बँकेच्या तिजोरीत न ठेवता स्वतःच्या खिशात ...

जिल्हा बँकेतील कॅशिअरनेच चोरली चार लाखांची रोकड
कोपरगाव : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत नोकरीस असलेल्या कॅशिअरने बँकेतील चार लाखांची रोकड बँकेच्या तिजोरीत न ठेवता स्वतःच्या खिशात घालून चोरी केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख शाखेत १२ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र, सर्व खातरजमा झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हा प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून, ही चोरी कॅशिअरनेच केली असल्याची खात्री पटल्यानंतर बँकेचे कर्मचारी जितेंद्र माधव मोरे (वय ३८, रा. द्वारकानगरी, कोपरगाव) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून कॅशिअर बाळासाहेब नाथा पवार (रा. चासनळी, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार झाला असून, या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमरनाथ गवसने करीत आहेत.