दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक, एक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:37 IST2018-05-31T19:37:09+5:302018-05-31T19:37:45+5:30

नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन आॅइल मिल जवळ लपून बसलेले दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर एक जण पसार झाला.

Four accused arrested for the robbery, a pistol | दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक, एक पसार

दरोड्याच्या तयारीतील चार आरोपींना अटक, एक पसार

नेवासा : नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन आॅइल मिल जवळ लपून बसलेले दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर एक जण पसार झाला. अमित अशोक नगरे (वय-२१ रा.खंडोबा मंदिराजवळ खुपटी रोड नेवासा), उमेश सूर्यभान राठोड (वय-२४ रा.संजय नगर मुकुंदवाडी जि. औरंगाबाद), गणेश रामभाऊ ढोकणे (वय-२९ रा.शेंडे गल्ली नेवासा), फैजल सादिक देशमुख (वय-२१ रा.कडूगल्ली) नेवासा यांना अटक केली तर संदीप बोडखे (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हा फरार झाला. दरोडेखोरांकडून कु -हाड, लोखंडी गज, लाकडी काठी, मिरची पूड, स्क्रु ड्रायव्हर व पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
        पोलीस कर्मचारी महेश कचे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री गस्त सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, भीम पवार, जयवंत तोडमल, राहुल यादव, वसीम इनामदार सरकारी वाहनातून नेवासा परिसरात गस्त घालत होते. यावेळी नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन आॅइल मिल जवळ एक झुडपाच्या आडोशाला चार ते पाच जण इसम चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले आहेत अशी माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी जात चार जणांना पकडले मात्र एक जण तेथून पसार झाला. आरोपींकडून एक ट्रॅक्टर व तीन मोटारसायकली असा अंदाजे आठ ते नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पाच जणांविरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Four accused arrested for the robbery, a pistol