माजी सैनिकाचे घर फोडणारा मिथून गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 20:24 IST2019-02-15T20:24:46+5:302019-02-15T20:24:50+5:30

नगर तालुक्यातील चास येथे माजी सैनिकाचे घर फोडून ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मिथून उबºया काळे (वय १९ रा़ सुरेगाव ता़ श्रीगोंदा) याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर फाटा येथून अटक केली़

Former soldier's house breaker Mithun Gazaad | माजी सैनिकाचे घर फोडणारा मिथून गजाआड

माजी सैनिकाचे घर फोडणारा मिथून गजाआड

अहमदनगर: नगर तालुक्यातील चास येथे माजी सैनिकाचे घर फोडून ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या मिथून उबºया काळे (वय १९ रा़ सुरेगाव ता़ श्रीगोंदा) याला शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसापूर फाटा येथून अटक केली़
मिथून याने २१ जानेवारी रोजी चास येथे माजी सैनिक संभाजी इंद्रभान कार्ले यांच्या घरी चोरी केली होती़ या गुन्ह्यातील आरोपी विसापूर फाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़ माहितीनुसार पोलीस उपनिरिक्षक रोहन खंडागळे, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलीस नाईक दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, रविंद्र कर्डिले, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश सातपुते, संदिप दरंदले यांच्या पथकाने विसापूर फाटा येथून मिथून काळे याला अटक केली़ काळे याने एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे़
 

 

Web Title: Former soldier's house breaker Mithun Gazaad