माजी मंत्री कोल्हे, माजी खासदार स्व. काळे यांना जीवन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:59+5:302021-02-26T04:28:59+5:30

राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच योगदानाबद्दल राज्यस्तरीय दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाची ...

Former Minister Kolhe, former MP late. Glory to Kale | माजी मंत्री कोल्हे, माजी खासदार स्व. काळे यांना जीवन गौरव

माजी मंत्री कोल्हे, माजी खासदार स्व. काळे यांना जीवन गौरव

राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच योगदानाबद्दल राज्यस्तरीय दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाची गेल्या १३ वर्षांपासून पुरस्कार वितरणाची परंपरा कायम राखली आहे. यंदाचे पुरस्कार देण्यासाठी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांची पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने वरील पुरस्कार देण्यासंदर्भात एकमताने निर्णय घेतला.

पुरस्कार जाहीर करण्यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिंदे, कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, खजिनदार सिद्धार्थ मेहरखांब, संघटक दिलीप दुशिंग, भागा वरखडे, प्रा. साहेबराव दवंगे, किरण नाईक, प्रा.डॉ. एस.आर. बखळे, सचिन धर्मापुरीकर, नानासाहेब शेळके, रोहित टेके, सोमनाथ सोनपसारे, रफीक रंगरेज, लक्ष्मण वावरे, योगेश डोखे, मोबीन खान, संतोष देशमुख, लक्ष्मण जावळे, राहुल देवरे, शिवाजी जाधव, अक्षय खरात, नितीन जाधव, विजय शेळके, राजेंद्र गाडे, निवृत्ती शिंदे, हेमचंद्र भवर, दत्तात्रेय गायकवाड, गोरख वर्पे, पुंडलिक नवघरे, काकासाहेब खर्डे, श्याम गवंडी, योगेश रुईकर, संजय लाड, संजय भवर, बिपिन गायकवाड उपस्थित होते.

( २५ कोल्हे, २५ काळे)

............

Web Title: Former Minister Kolhe, former MP late. Glory to Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.