भाजपच्या माजी नेवासा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षाची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:28+5:302021-07-25T04:19:28+5:30

भेंडा : पक्षविरोधी कामे केल्याने नेवासा तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल ताके, दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची ...

Former BJP Nevasa taluka president, city president fired | भाजपच्या माजी नेवासा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षाची हकालपट्टी

भाजपच्या माजी नेवासा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षाची हकालपट्टी

भेंडा : पक्षविरोधी कामे केल्याने नेवासा तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल ताके, दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा निर्णय नगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठक घेतल्याची माहिती तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी दिली.

भाजपची जिल्हास्तरीय बैठक शुक्रवारी नगर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार वैभव पिचड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसर्डा, जिल्‍हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेतून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अनिल ताके, दिनकर गर्जे, माजी शहराध्यक्ष पोपट जिरे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पक्षाच्या विरोधात कोणी काम करत असेल व त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असेल. अशांना पक्षातून काढून टाका. पक्षाच्या विरोधात पत्रक बाजी करणे. पक्षविरोधी काम करणे. पक्षाची प्रतिमा मलिन होईल, अशी काम करणे, विरोधकांना मदत करणे. अशांची पक्षातून हकालपट्टी करा, असे स्पष्ट आदेश पाटील यांनी दिले.

---

कोविड काळात भाजपचे कार्यकर्तेच मैदानात..

तालुक्यात मागील काळापासून लोकांच्या नजरेत भरेल अशी कामे भाजपने केली. असे असताना काही कार्यकर्ते भाजपमध्ये राहून पक्षाचे खच्चीकरण करण्याचे काम विरोधकांच्या सांगण्यावरून करतात. विरोधकांचे तालुक्यात काडीमात्र काम नाही. कोविड काळात फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सेवा करत होते. त्याचप्रमाणे रस्ता, वीज, पाणी, आरोग्य अशी जनतेच्या नजरेत भरणारीही कामे केली. शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव मिळावा यासाठी वेळोवेळी आंदोलने केली. असे असताना काहींनी पक्षात राहून पक्षविरोधी काम केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे, असे फुलारी यांनी सांगितले.

Web Title: Former BJP Nevasa taluka president, city president fired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.