माजी कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन वचनपूती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:44 IST2020-10-18T15:42:53+5:302020-10-18T15:44:02+5:30
मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते. आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन वचनपूर्ती करावी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.

माजी कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन वचनपूती करावी
भेंडा : मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते. आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन वचनपूर्ती करावी व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी केली.
गोधेगाव (ता.नेवासा) येथील मच्छिंद्र जाधव व विजय जाधव या शेतकऱ्यांच्या चार एकर शेतातील कपाशीचे पीक पूर्ण सडून गेले. त्याची शनिवारी बोंडे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. पालकमंत्री इकडे फिरकले नाहीत. अस्मानी संकट आले. तरीही सरकारला जाग येत नसल्याची टीका बोंडे यांनी केले.
महाराष्ट्रात १५५ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कुटुंबातील घटक समजून त्वरीत मदत करण्याचे आवाहनही बोंडे यांनी केले.