राहुरी खुर्द ग्रामपंचायतीत काॅंटे की टक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:32+5:302021-01-13T04:51:32+5:30
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून तनपुरे साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस यांची बुवासाहेब मंडळाची सत्ता आहे. सत्ताधारी ...

राहुरी खुर्द ग्रामपंचायतीत काॅंटे की टक्कर
राहुरी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून तनपुरे साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस यांची बुवासाहेब मंडळाची सत्ता आहे. सत्ताधारी विरोधी जनसेवा मंडळाच्या निर्मलाताई मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे केले आहे. पाच प्रभाग असून १५ जागा आहेत. घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. सत्ताधार्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये काहीही विकास केला नाही. गल्लोगल्ली अस्वच्छता वाढली आहे. नाली साफ केली जात नाही. स्ट्रीटलाईट बंद आहेत. स्मशानभूमीचा प्रश्न रेंगाळला आहे. शाळेचा विकास नाही. आरोग्य केंद्र तीन वर्षांपासून उद्घाटन होऊनही बंद आहे, अशी टीका विरोधक करीत आहेत.
सत्ताधारी ही विरोधकांना उत्तर देत असून आम्ही विविध प्रकारच्या शासनाच्या योजना राबविल्या आहेत. वेगवेगळ्या शासनाच्या योजना राबविल्यामुळे गावाचा विकास होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सत्ताधार्यांनी चांगला कारभार केला असल्याचा दावा नंदकुमार डोळस यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विरोधक कधीही वाॅर्डात फिरत नाहीत. निवडणुकीच्या वेळेस जागे होतात. त्यामुळे त्यांना दहा वर्षांपासून सत्तेपासून दूर ठेवण्यात आले आहे. यापुढील पाच वर्षे ही आमच्या ताब्यात सत्ता राहील, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे. त्यामुळे राहुरी खुर्द ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची बनली असून पुन्हा सत्ताधारी बाजी मारणार की विरोधकांना संधी मिळणार याकडे मतदारांची लक्ष वेधले आहे.
....