जंगलेवाडीत बिबट्या आला रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 11:08 IST2019-06-15T11:07:27+5:302019-06-15T11:08:05+5:30

ऊसाचे माहेरघर असलेल्या जंगलेवाडीत शनिवारी रात्री बिबट्याने डरकाळी फोडली. त्याचदरम्यान उदयसिंह जंगले यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला.

 The forest leopard ray! | जंगलेवाडीत बिबट्या आला रे!

जंगलेवाडीत बिबट्या आला रे!

श्रीगोंदा : ऊसाचे माहेरघर असलेल्या जंगलेवाडीत शनिवारी रात्री बिबट्याने डरकाळी फोडली. त्याचदरम्यान उदयसिंह जंगले यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला. त्यामुळे जंगलेवाडी परिसरातील बागायतदार व शेतमजुरांमध्ये घबराट निर्माण झाली.
शनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कुत्री जोरजोरात फुंकत होती. नाईट वॉचमन हरिभाऊ शिंदे यांनी बॅटरी लावून पाहिले तर त्यांना बिबट्या दिसला. शिंदेंनी शाळेकडे पळ काढला. दरम्यानच्या काळात विद्या निकतेनच्या मागे राहणारे उदयसिंह जंगले यांच्या कुत्र्यांचा फडशा पाडला. सकाळी प्राणी मित्र कमलेश गुंजाळ यांनी पाहणी केली असता बिबट्याचे पदमार्क असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

 

Web Title:  The forest leopard ray!