वनविभागाचा सर्व्हेअर लाचेच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 2, 2016 00:34 IST2016-04-02T00:27:20+5:302016-04-02T00:34:48+5:30
अहमदनगर : खाणपट्ट्याच्या प्रस्तावाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील सर्व्हेअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली.

वनविभागाचा सर्व्हेअर लाचेच्या जाळ्यात
अहमदनगर : खाणपट्ट्याच्या प्रस्तावाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील सर्व्हेअरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. सीताराम परसराम चव्हाण असे अटक केलेल्या सर्व्हेअरचे नाव आहे.
चार शिवारात जमीन असलेल्या शेतकऱ्याने दगडाची खाणपट्टी तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळावे, यासाठी शेतकऱ्याने वनविभागाकडे अर्ज केला. सर्व्हेअर चव्हाण याने शेतकऱ्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. शुक्रवारी कार्यालयात ही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष चव्हाण यास रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक विजय मुर्तडक, सुनील पवार, काशिनाथ खराडे, राजेंद्र सावंत, प्रमोद जरे, नितीन दराडे, तन्वीर शेख, एकनाथ आव्हाड, प्रशांत जाधव, अंबादास हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)