परप्रांतीय ट्रकचालकांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू, निर्मळ प्रिंप्री येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 15:16 IST2020-09-07T15:15:43+5:302020-09-07T15:16:57+5:30
लोणी : राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.

परप्रांतीय ट्रकचालकांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू, निर्मळ प्रिंप्री येथील घटना
लोणी : राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.
रविवारी रात्री १०.१५ते १०३० वाजण्याच्या सुमारास लूट करण्यात आली. सहा ते सात जणांनी तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याचा वापर करून ही लूट केली. लुटारू जवळच्या शेतात पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस प्रमुखांसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.