नगर - पुणे शटल रेल्वेसाठी पाठपुरावा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:45+5:302021-03-06T04:20:45+5:30
याबाबत विखे यांना निवेदन देतेवेळी संघटनेचे हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक कानडे, सुहास मुळे, सुनील छाजेड आदी उपस्थित होते. ...

नगर - पुणे शटल रेल्वेसाठी पाठपुरावा करा
याबाबत विखे यांना निवेदन देतेवेळी संघटनेचे हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक कानडे, सुहास मुळे, सुनील छाजेड आदी उपस्थित होते. शटल रेल्वेचा प्रश्न दिनांक २० फेब्रुवारी २०२० मध्ये अधिवेशनात मांडण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या काळात पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी विखे यांनी दिले. नगर - पुणे रस्त्यावर सातत्याने वाढत असलेल्या वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे पुणे - नगर प्रवासाचा वेळ वाढून तो चार तासांहून अधिक झाला आहे. सध्या हा मार्ग चौपदरी आहे. मात्र, तो कमी पडत आहे. त्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच अहमदनगर - पुणे थेट रेल्वे सेवा सुरू केल्यास इंधनाची बचत होणार आहेच. पण, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदारवर्गाला यामुळे सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास दोन्ही शहरांच्या दृष्टीने सोयीचे होऊन रेल्वे विभागालाही आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. असे विखे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फोटो ०५ निवेदन
ओळी- नगर ते पुणे शटल रेल्वेसंदर्भात जिल्हा प्रवासी संघटनेच्यावतीने खासदार सुजय विखे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अशोक कानडे, सुहास मुळे, सुनील छाजेड आदी उपस्थित होते.