पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक जनतेसमोर ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:51+5:302021-03-21T04:20:51+5:30
अकोले : दरबारी राजकारण मला मान्य नाही, ‘लोक माझे सांगाती’ असे लोकाभिमुख समाजकारण करून पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक जनतेसमोर ठेवणार ...

पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक जनतेसमोर ठेवणार
अकोले : दरबारी राजकारण मला मान्य नाही, ‘लोक माझे सांगाती’ असे लोकाभिमुख समाजकारण करून पाच वर्षांचे प्रगतिपुस्तक जनतेसमोर ठेवणार आहे. सहकारातले मला फारसे कळत नाही. मात्र सीताराम गायकर, परबत नाईकवाडी, विठ्ठल चासकर, भाऊपाटील नवले यांच्या सहकारातील अनुभवातून तालुक्यातील सहकारी संस्थांना उर्जितावस्था आणू, असा विश्वास आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी दिला.
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा शनिवारी दुपारी पार पडला. यावेळी आ. लहामटे बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेेते अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, अमित भांगरे, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, संपत नाईकवाडी, विठ्ठल चासकर, परबत नाईकवाडी, स्वाती शेणकर, पोपट दराडे, भाऊ पाटील नवले, प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे उपस्थित होते.
कोविड संकटात ४०-५० कोटींची विकास कामे तालुक्यात आणली. घुग-याची भाषा काय करता राष्ट्रवादीने तुम्हाला भरभरून दिले. त्यांना तुम्ही विसरले. गायकर व त्यांचे सहकारी पक्षात परतले ही पक्षबळकटीसाठी लाभदायक बाब आहे. माजी मंत्री पिचडांसारखी सर्व सत्ता घरात ठेवणार नाही. सत्ता विकेंद्रीकरण करण्यासाठी पुढाकार घेऊ. तुम्हाला करमत नसेल; पण आता भाजपमध्ये तरी एकनिष्ठ राहा, असा खोचक सल्ला पिचड व त्यांच्या कार्यकर्त्यांना आ. लहामटे यांनी दिला.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र कुमकर यांनी केले. यावेळी रवी मालुंजकर, विकास बंगाळ, प्रा. चंद्रभान नवले, बाळासाहेब भोर, भागवत शेटे, ईश्वर वाकचौरे, विनोद हांडे, कचरू पाटील शेटे, कैलास शेळके, अप्पा आवारी, माधव भोर, सीमा मालुंजकर, उज्ज्वला राऊत आदी उपस्थित होते. संदीप शेणकर यांनी आभार मानले.
.....