पाच संशयित ताब्यात

By Admin | Updated: March 18, 2024 18:06 IST2014-05-17T00:41:03+5:302024-03-18T18:06:06+5:30

पाथर्डी : तालुक्यातील केळवंडी येथील दरोड्यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

Five suspects in custody | पाच संशयित ताब्यात

पाच संशयित ताब्यात

पाथर्डी : तालुक्यातील केळवंडी येथील दरोड्यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. सहा दरोडेखोरांनी बुधवारी रात्री अकराच्या सुमारास केळवंडी येथील खोजे वस्तीवर दरोडा टाकून सुमारे एक लाख, तीस हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच दरोडेखोरांनी सुखदेव बाळाजी खोजे, खंडू बाळाजी खोजे व रंजना रामचंद्र चेके यांना दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले होते. या मारहाणीत एका महिलेचा कानही तुटला. घटनेनंतर अर्ध्या तासात पाथर्डीचे पोलीस केळवंडी येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी तपासाची सूत्रे तातडीने हलवून गावातीलच पाच जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी) कसून चौकशी या दरोड्यासंदर्भात पोलिसांनी केळवंडी गावातील पाच जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. या संशयितांकडून महत्वाची माहिती मिळाली असून या दरोड्याचा तपास लवकरच लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Five suspects in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.