शहरात आणखी पाच कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:49+5:302021-03-18T04:20:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बुधवारी आणखी पाच ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे ...

Five more containment zones in the city | शहरात आणखी पाच कंटेनमेंट झोन

शहरात आणखी पाच कंटेनमेंट झोन

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बुधवारी आणखी पाच ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे कंटेनमेंट झोनची संख्या १५ झाली असून, हा भाग पत्रे लावून बंद करण्यात आला आहे.

शहर व परिसरातील कोरोनाचा आकडा १९६ झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोन केले आहेत. हे मायक्रो कंटेनमेंट झोन असून, ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत, तेवढाच भाग बंद केला जातो. मनपाने बुधवारी केडगाव येथील अयोध्यानगरमधील श्रीराम मंदिर व उदयनराजेनगर परिसर कंटेनमेंट केला आहे. तसेच बालिकाश्रम रोडवरील बाेरुडे मळ्यातील भाग्योदय रेसिडेन्सी, सावेडी उपनगरातील भाग्योदय सोसायटीचे प्रवेशव्दार, भिंगारदिवे मळ्याच्या बाजूला असलेले प्रेमदान हडको परिसरातील काही भाग कंटेनमेंट करण्यात आला आहे. हा भाग येत्या ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शहरात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क व सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे महापालिकेने चार भरारी पथकांची नेमणूक केली आहे. ही पथके शहरात फिरून कारवाई करणार आहेत. कंटेनमेंट केलेल्या भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना सशुल्क सेवा पुरविणार असल्याचे सांगण्यात आले.

....

- महापालिकेने चार भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकासोबत पोलीसही असणार आहेत. महापालिका व पोलीस प्रशासन संयुक्तपणे कारवाई करणार आहे. नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सींचे नियम पाळून सहकार्य करावे.

- यशवंत डांगे, उपायुक्त

Web Title: Five more containment zones in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.