साकत खुर्दमध्ये पाच दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:50+5:302021-04-02T04:21:50+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी (दि. १) झालेल्या रॅपिड टेस्ट ...

साकत खुर्दमध्ये पाच दिवस जनता कर्फ्यू
केडगाव : नगर तालुक्यातील साकत खुर्द येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी (दि. १) झालेल्या रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये गावातील ९ व वाळुंज येथील १ असे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे गावात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
साकत खुर्द येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अकोळनेरच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनीही गावपातळीवर पाच दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता आज, शुक्रवार ते मंगळवार (दि. ६) या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत गाव बंद राहणार आहे. या वेळेत नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, विनाकारण फिरू नये, असे आवाहन उपसरपंच बाबासाहेब चितळकर यांनी केले आहे.