ग्रामीण रुग्णालयाला पाच बायपॅप मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:51+5:302021-04-18T04:19:51+5:30
यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांनी शुक्रवारी (दि. १६) विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्राला भेट दिली होती. ग्रामीण रुग्णालयाचे ...

ग्रामीण रुग्णालयाला पाच बायपॅप मशीन
यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजित थोरात यांनी शुक्रवारी (दि. १६) विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्राला भेट दिली होती. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, डॉ. सीमा घोगरे आदींशी थोरात यांनी संवाद साधला होता. रुग्णांवर उपचार करताना येणाऱ्या अडचणी, उपलब्ध असलेली वैद्यकीय साम्रगी, औषधी आदींची माहिती घेतली. गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज असते. त्यासाठी बायपॅप मशीनची आवश्यकता असल्याने थोरात यांनी तत्काळ हे पाच मशीन उपलब्ध करून दिले.
ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच ऑक्सिजनचे ४० बेड नव्याने सुरू करण्यात आले असून या केंद्रात एकूण बेड झाले आहेत. यशोधन कार्यालयातील आरोग्य विभागप्रमुख महेश वाव्हळ यावेळी उपस्थित होते.