शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावकरांना शिर्डी-मुंबई विमान प्रवासाचा प्रथम मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:13 IST

कोपरगाव : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाºया ‘एलाइंस एयर’ कंपनीच्या शिर्डी-मुंबई प्रथम विमानाचे प्रवासी होण्याचा मान कोपरगावच्या तिघा तरूणांना ...

ठळक मुद्दे६ साईभक्तांचे उड्डाण५५ मिनिटांचा हवाई प्रवास

कोपरगाव : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाºया ‘एलाइंस एयर’ कंपनीच्या शिर्डी-मुंबई प्रथम विमानाचे प्रवासी होण्याचा मान कोपरगावच्या तिघा तरूणांना मिळाला.१ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी शिर्डी ते मुंबई या प्रथम विमान उड्डाणास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ‘एलाइंस एयर’ कंपनीचे पहिले विमान ३ भारतीय व ३ मलेशियन असे ६ प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने झेपावले. शिर्डी-मुंबई या पहिल्या विमान प्रवासाचे साक्षीदार होण्याचा मान कोपरगावचे साईभक्त सुशांत घोडके, परेश उदावंत व संतोष गंगवाल तसेच मलेशियाचे विवेकानंदन बालकृष्णन, हनिता आॅर्नोबिंडो, प्रेमनाथ विवेकानंदन यांना मिळाला. या प्रवाशांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब होती. विमानाने आकाशात झेप घेताच साईभक्तांमध्ये उत्साह संचारला. पंचावन्न मिनिटांच्या प्रवासानंतर बरोबर साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. कॅप्टन राकेश शेट्टी व पायलट मिनाक्षी यांनी शिर्डी ते मुंबई विमानाचे सारथ्य केले...............................साईबाबा समाधी शताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या प्रवासाचे प्रथम मानकरी ठरल्याचा क्षण अविस्मरणीय आहे. विमान सेवेमुळे सार्इंच्या पदस्पर्शाने पुनीत गोदातिरावरील शुक्राचार्य, उपासनी महाराज, संत जनार्दन स्वामी, रामदासी बाबा, शनी शिंगणापूर, जंगली महाराज आदी धार्मिक स्थळांची महती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढून स्थानिक पर्यटन व रोजगाराला चालना मिळेल.- सुशांत घोडके, पहिले प्रवासी....................................फोटो- ०३१०२०१७केओपी०१ विमान प्रवासीओळी- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिर्डी ते मुंबई प्रथम विमानातील प्रवासी स्वच्छतादूत सुशांत घोडके, परेश उदावंत व संतोष गंगवाल यांना विशेष पत्र व भेटवस्तू देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, आमदार स्नेहलता कोल्हे, विमान चालन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी.