कोपरगावकरांना शिर्डी-मुंबई विमान प्रवासाचा प्रथम मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:13 IST2017-10-03T16:07:48+5:302017-10-03T16:13:43+5:30

कोपरगाव : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाºया ‘एलाइंस एयर’ कंपनीच्या शिर्डी-मुंबई प्रथम विमानाचे प्रवासी होण्याचा मान कोपरगावच्या तिघा तरूणांना ...

The first value of Shirdi-Mumbai aircrafts for Kopargaonkar | कोपरगावकरांना शिर्डी-मुंबई विमान प्रवासाचा प्रथम मान

कोपरगावकरांना शिर्डी-मुंबई विमान प्रवासाचा प्रथम मान

ठळक मुद्दे६ साईभक्तांचे उड्डाण५५ मिनिटांचा हवाई प्रवास

कोपरगाव : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाºया ‘एलाइंस एयर’ कंपनीच्या शिर्डी-मुंबई प्रथम विमानाचे प्रवासी होण्याचा मान कोपरगावच्या तिघा तरूणांना मिळाला.
१ आॅक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी शिर्डी ते मुंबई या प्रथम विमान उड्डाणास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर ‘एलाइंस एयर’ कंपनीचे पहिले विमान ३ भारतीय व ३ मलेशियन असे ६ प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने झेपावले. शिर्डी-मुंबई या पहिल्या विमान प्रवासाचे साक्षीदार होण्याचा मान कोपरगावचे साईभक्त सुशांत घोडके, परेश उदावंत व संतोष गंगवाल तसेच मलेशियाचे विवेकानंदन बालकृष्णन, हनिता आॅर्नोबिंडो, प्रेमनाथ विवेकानंदन यांना मिळाला. या प्रवाशांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब होती. विमानाने आकाशात झेप घेताच साईभक्तांमध्ये उत्साह संचारला. पंचावन्न मिनिटांच्या प्रवासानंतर बरोबर साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरले. कॅप्टन राकेश शेट्टी व पायलट मिनाक्षी यांनी शिर्डी ते मुंबई विमानाचे सारथ्य केले.
..............................
साईबाबा समाधी शताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या प्रवासाचे प्रथम मानकरी ठरल्याचा क्षण अविस्मरणीय आहे. विमान सेवेमुळे सार्इंच्या पदस्पर्शाने पुनीत गोदातिरावरील शुक्राचार्य, उपासनी महाराज, संत जनार्दन स्वामी, रामदासी बाबा, शनी शिंगणापूर, जंगली महाराज आदी धार्मिक स्थळांची महती आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढून स्थानिक पर्यटन व रोजगाराला चालना मिळेल.
- सुशांत घोडके, पहिले प्रवासी
....................................
फोटो- ०३१०२०१७केओपी०१ विमान प्रवासी
ओळी- शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिर्डी ते मुंबई प्रथम विमानातील प्रवासी स्वच्छतादूत सुशांत घोडके, परेश उदावंत व संतोष गंगवाल यांना विशेष पत्र व भेटवस्तू देताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, आमदार स्नेहलता कोल्हे, विमान चालन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी.

Web Title: The first value of Shirdi-Mumbai aircrafts for Kopargaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.