नगरला मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राज्यात प्रथमच राष्ट्रीय सेवा योजनेचे युनीट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:22 IST2019-09-29T14:49:01+5:302019-09-29T15:22:32+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ अहमदनगर महाविद्यालयानेच रोवली. त्यापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात राज्यातील पहिले राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करण्याचा मानही अहमदनगर महाविद्यालयाला मिळाला. ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. रजनीश बार्नबस यांनी केले.

नगरला मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राज्यात प्रथमच राष्ट्रीय सेवा योजनेचे युनीट सुरू
अहमदनगर : राष्ट्रीय सेवा योजनेची मुहूर्तमेढ अहमदनगरमहाविद्यालयानेच रोवली. त्यापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात राज्यातील पहिले राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करण्याचा मानही अहमदनगर महाविद्यालयाला मिळाला. ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. रजनीश बार्नबस यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. प्रकाश शेळके, डॉ. शरद बोरूडे, प्रा. विकास कांबळे, प्रा. सुवर्णा भुजबळ, प्रा. विकी मोरे, प्रा. संजय ठोंबरे, प्रा. केशव पवार, रवी जाधव, गणेश माने, अजित साळवे, संदीप साळवे आदी उपस्थित होते.
डॉ. बार्नबस म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभागातून विद्यार्थ्यांची सामाजिक जाण अधिक समृद्ध होईल. अहमदनगर महाविद्यालय विविध उपक्रमांत नेहमीच नाविन्यपूर्ण भूमिका घेते. मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रमात सहभाग वाढावा. त्यातून त्यांची सामाजिक समज वाढावी. यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
मुक्त विद्यापीठच्या अहमदनगर कॉलेज अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. ७० स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानाची स्वच्छता केली. सूत्रसंचालन डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी केले. गणेश माने यांनी आभार मानले.