बाळ बोठेला पहिला धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:34 IST2020-12-16T13:33:47+5:302020-12-16T13:34:14+5:30
अहमदनगर : यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने ...

बाळ बोठेला पहिला धक्का; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर: यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
जरे हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर शहरातून पसार झालेल्या बोठे याने जिल्हा न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनासाठी 7 डिसेंबर रोजी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.नातू यांच्यासमारे या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. सतीश पाटील यांनी युक्तीवाद करत बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याने त्याला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी केली होती. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने निर्णय देत बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याला आता जामीनासाठी खंडपिठात धाव घ्यावी लागणार आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून फरार असलेला बोठे
अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. हे विशेष. 30 डिसेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेली आहे. या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी बोठे याला अटक होणे गरजेचे आहे तो मात्र पोलिसांना काही सापडेना.