ताहाराबाद रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:47+5:302021-02-12T04:20:47+5:30
भंडारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने सर्व रुग्णालयांना फायर सेफ्टी ऑडिट व फायर सेफ्टी प्रशिक्षण देण्याचे ...

ताहाराबाद रुग्णालयात आग प्रतिबंधक प्रशिक्षण
भंडारा जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासनाने सर्व रुग्णालयांना फायर सेफ्टी ऑडिट व फायर सेफ्टी प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार ताहाराबाद रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी राजेंद्र पवार यांनी एलपीजी गॅस व इलेक्ट्रिक आग लागल्यास ती ताबडतोब कशी विझवता येईल, याबाबत प्रात्यक्षिक करून माहिती दिली. तसेच आगी संदर्भात फायर यंत्रणेचे प्रकार, आगीचे वर्गीकरण, आग विझविण्याच्या पद्धती याची सविस्तर माहिती दिली. डॉ. रणसिंग यांनी मानव शरीरात धूर गेल्यास तत्काळ काय उपाययोजना करावे, याची माहिती दिली. यावेळी राहुरी पालिकेचे उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, ड्रायव्हर ऑपरेटर विलास गडाख, फायरमन बाळू पवार, सुरेश वाघ, नरेंद्र मोरे तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी दत्तात्रय कोल्हे, जिलानी बेग, रभाजी शिंदे, सोमनाथ अहेरे, राहुल डेंगळे, जुनेद सय्यद, भाऊसाहेब नवघरे, अनिता तांबे आदी उपस्थित होते.