अळकुटीतील महावितरणच्या उपकेंद्राला आग; अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 14:38 IST2020-08-29T14:37:15+5:302020-08-29T14:38:40+5:30
बारा गावांना वीज पुरवठा करणा-या अळकुटी येथील वीज उपकेंद्रात शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे.

अळकुटीतील महावितरणच्या उपकेंद्राला आग; अनर्थ टळला
अळकुटी : बारा गावांना वीज पुरवठा करणा-या अळकुटी येथील वीज उपकेंद्रात शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे.
अळकुटी येथील वीज केंद्राला आग लागल्यानंतर परिसरात मध्ये मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होते. आग लागल्यानंतर मेन ट्रान्स्फरकडे जाणारी लाईट ट्रिप झाली. यामुळे मोठे नुकसान टळले, असे वायरमेन प्रकाश पुंड यांनी सांगितले.
दरम्यान आग लागताच येथील कर्मचारी संतोष शिंदे, गोरख कनिगंध्वज, सत्यवान शेलार, सागर वाघ आदी कर्मचाºयांनी प्रसंगावधान ओळखत त्यांनी त्या ठिकाणीवर पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.