जवळेत घराला आग; संसारोपयोगी वस्तू खाक, चार लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 17:14 IST2020-03-08T17:07:09+5:302020-03-08T17:14:03+5:30
पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणा-या प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली.

जवळेत घराला आग; संसारोपयोगी वस्तू खाक, चार लाखांचे नुकसान
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवर राहणाºया प्रवीण नामदेव बरशिले यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील चार लाख रुपयांच्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी (दि.७ मार्च) संध्याकाळी ही घटना घडली.
शनिवारी संध्याकाळी अचानक वाढलेल्या विद्युत प्रवाहाने घरातील वस्तूने पेट घेतला. इतर ठिकाणीही वायर पेटल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य कपडे, धान्य, भांडे व महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. नेहमीप्रमाणे कामावरुन आल्यानंतर घराशेजारील गोठ्यात प्रवीण बरशिले साफसफाई करीत होते. यावेळी अचानक वाढलेल्या विद्युत दाब वाढला. यामुळे घरातील फ्रीजने पेट घेतला. यावेळी मोठा आवाज होऊन फ्रिजचा दरवाजा घराबाहेर उडून पडला. सुदैवाने येथे कोणी नसल्यान जखमी झाले नाही. यानंतर बरशिले यांनी लोकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रथम पाणी टाकले. घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे बरशिले यांनी सांगितले.
आगीच्या घटनेचा पंचनामा
रविवारी सकाळी जवळे येथील आगीच्या घटनेचा पंचनामा केला आहे. सदर अहवाल पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे सादर करणार आहे, अशी माहिती जवळे कामगार तलाठी आकाश जोशी यांनी दिली.