पांजरापोळमधील चारा डेपोला आग

By Admin | Updated: May 2, 2016 23:30 IST2016-05-02T23:15:16+5:302016-05-02T23:30:40+5:30

अहमदनगर : अरणगाव रोडवरील पांजरापोळ गोरक्षण संस्थेतील चारा गोडाऊनला रविवारी आग लागून कडबा खाक झाला़ या घटनेत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़

Fire Depot of Panjrapol | पांजरापोळमधील चारा डेपोला आग

पांजरापोळमधील चारा डेपोला आग

कडबा खाक : पाच लाखांचे नुकसान
अहमदनगर : अरणगाव रोडवरील पांजरापोळ गोरक्षण संस्थेतील चारा गोडाऊनला रविवारी आग लागून कडबा खाक झाला़ या घटनेत पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़
पांजरापोळमध्ये जनावरांसाठी गोडाऊनमध्ये कडबा साठवून ठेवलेला होता़ या कडब्यास रविवारी अचानक आग लागली़ यावेळी संस्थेतील कामगारांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला़ तसेच व्हीआरडीई संस्थेतील अग्निशमन पथकास बोलविण्यात आले़ पथकाने पाणी मारल्यानंतर ही आग आटोक्यात आली़ सध्या दुष्काळामुळे चारा टंचाई असून, आगीत कडबा जळाल्याने पांजरापोळ येथील जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Fire Depot of Panjrapol