व्यापाऱ्याचा तत्काळ शोध घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:56+5:302021-03-06T04:20:56+5:30
१ मार्च रोजी व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाले. या प्रकरणाबाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी संथ गतीने काम ...

व्यापाऱ्याचा तत्काळ शोध घ्या
१ मार्च रोजी व्यापारी गौतम हिरण यांचे अपहरण झाले. या प्रकरणाबाबत श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी संथ गतीने काम करीत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह हिरण यांच्या कुटुंबीयांना अजूनही सत्य माहिती समजली नाही, तर दुसरीकडे पोलिसांकडून हिरण कुटुंबीयांना घटनेबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे श्रीरामपूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्क्रियता समोर आलेली आहे. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दखल घेऊन व्यापारी हिरण यांचा शोध घेण्यासाठी उचित नियोजन हाती घेण्याची मागणी राहुरी तालुका व्यापारी असोसिएशनने केली आहे. व्यापाऱ्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या निष्क्रिय कार्यक्षमतेबद्दल निषेध नोंदविला. पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देत, व्यापारी गौतम बाबुलाल हिरण यांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, मयुरेश अग्रवाल, दीपक गुलदगड, आसिफ मुसाणी, अजय शेजूळ, रवींद्र वास्कर, राजकुमार लोढा, इश्वर सुराणा उपस्थित होते.