तनपुरे कारखान्यावर अखेर जप्तीचे हत्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 18:31 IST2017-04-24T18:31:34+5:302017-04-24T18:31:34+5:30
गेल्या अनेक वर्षांपासूनची सुमारे ८८ कोटी रूपयांची थकबाकी वांरवार सूचना देऊनही न भरल्याने अखेर जिल्हा सहकारी बँकेने राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.

तनपुरे कारखान्यावर अखेर जप्तीचे हत्यार
र हुरी : गेल्या अनेक वर्षांपासूनची सुमारे ८८ कोटी रूपयांची थकबाकी वांरवार सूचना देऊनही न भरल्याने अखेर जिल्हा सहकारी बँकेने राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. आता यातून मार्ग कसा काढायचा यावर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, कर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेकडून कशी सवलत दिली जाते, त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याने पाच वर्षांपूर्वी कामगारांचे पगार, ऊसउत्पादकांची देणी, तसेच इतर कारणांसाठी ८८ कोटी रूपयांचे कर्ज जिल्हा सहकारी बँकेकडून घेतले होते. परंतु कारखान्याने ते मुदतीत भरले नाही. बँकेने वांरवार नोटिसा, तसेच जप्तीचा इशारा दिला परंतु त्याकडे कारखान्याने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अधिकाºयांनी कारखानास्थळावर जात कारखान्याचे कार्यालय, इमारत, नाट्यगृह, पेट्रोलपंप, तसेच इतर मालमत्ता जप्त केली. आता कारखाना प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)