मनपात ११ अभियंत्यांची पदे भरण्यास अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:13+5:302021-01-13T04:54:13+5:30
अहमदनगर : महापालिकेत अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी नव्हती. त्याचा थेट परिणाम शहर विकासाच्या प्रकल्पांवर होत असून, महापालिकेत अभियंत्यांची ११ ...

मनपात ११ अभियंत्यांची पदे भरण्यास अखेर मंजुरी
अहमदनगर : महापालिकेत अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी नव्हती. त्याचा थेट परिणाम शहर विकासाच्या प्रकल्पांवर होत असून, महापालिकेत अभियंत्यांची ११ पदे नव्याने भरण्यास नगरविकास विभागाने परवानगी दिली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
सन २०१६ मध्ये महापालिकेच्या आकृतिबंधास मंजुरी मिळालेली आहे; परंतु तांत्रिक पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. त्यामुळे अभियंत्यांची पदे भरली गेली नाहीत. अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने शहर विकासाचे प्रकल्प राबिवताना अनेक अडचणी येत होत्या. महापालिकेत अभियंत्यांची ११ पदे भरण्याची परवानगी मिळावी, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगरविकास खात्याकडे पाठपुरवा केला. नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान अभियंत्यांची पदे भरण्यास परवानगी देण्यात आली असून, तसा आदेशही जारी करण्यात आला आहे.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा, अशी कर्मचारी युनियनची मागणी आहे. महापालिकेकडून तसा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविलेला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नव्हता. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सन २०१६ पासून लागू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे; परंतु उत्पन्नवाढीच्या अटीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
..
..
सूचना फोटो : संग्राम जगताप नावाने आहे.