विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: July 25, 2014 00:25 IST2014-07-25T00:08:41+5:302014-07-25T00:25:23+5:30
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र लवकरच दाखल होतील़ मतदार नोंदणीसाठीचे अभियान गतिमान करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयांना नाव नोंदणीच्या सूचना देण्यात आहेत

विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र लवकरच दाखल होतील़ मतदार नोंदणीसाठीचे अभियान गतिमान करण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयांना नाव नोंदणीच्या सूचना देण्यात आहेत, असे सांगून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी गुरुवारी दिली़
विधानसभा निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ कवडे म्हणाले, मतदारांची पुरवणी यादी येत्या ३१ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे़ ही मतदार यादी नोंदणीकृत आठ राजकीय पक्षांना पुरविण्यात येणार आहे़ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र येत्या १ आॅगस्ट रोजी दाखल होणार आहेत़ मतदान यंत्र बंद पडणे, तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना घडत असल्याने निवडणुकीसाठी सन २००६ नंतरची ५ हजार ४०० मतदान यंत्र इतर राज्यांतून उपलब्ध होणार आहे़ ही यंत्र अमेठी, बागपत फिरोजाबाद आणि रायबरेली येथून आणली जातील, असे ते म्हणाले़
मतदार नोंदणीसाठीचे अभियान राबविण्यात येत आहे. महिलांची नाव नोंदणी समाधानकारक नाही़ त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी करण्यावर शेवटच्या टप्प्यात भर देण्यात येणार आहे़ सन २०११ मध्ये झालेल्या जणगणनेनुसार ही निवडणूक होत असून, आतापर्यंत ३२ लाख ३ हजार ४५१ मतदारांची नोंदणी झाली आहे़ तुलनेत महिलांची मतदार नोंदणी कमी आहे़ एक हजार पुरुषांमागे ३८ महिला मतदार नोंदणी, असे प्रमाण आहे़ महिला मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे़ लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाचे प्रमाण कमी आहे़ ते वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील़ त्यासाठी सहकारी संस्था, सोसायटी, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था, पतसंस्थांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत़ पुढील काळात हे प्रमाण वाढवून महिलांचे मतदान वाढेल,अशी अपेक्षा आहे़ (प्रतिनिधी)
घरपोहोच स्लीप
जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदारांची माहिती घेण्यात आली आहे़ मतदारांना यावेळी घरपोहोच स्लीप मिळणार आहे़प्रत्येकाला स्लीप मिळेल,याची व्यवस्था निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात येणार असून, मतदारांनी याबाबत निश्चिंत राहावे,असे आवाहन कवडे यांनी केले आहे़
मतदार नोंदणी
एकूण मतदार- ३२, ०३,४५१
पुरुष मतदार-१६, ८४, २१८
महिला मतदार- १५, १८, १२९