निर्मलाताई काकडे महाविद्यालयाला अंतिम मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:26 IST2021-09-04T04:26:09+5:302021-09-04T04:26:09+5:30
आबासाहेब काकडे यांनी १९६९ साली मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यावेळी मान्यता मिळाली नाही. तेव्हापासून ते आजपर्यंत ...

निर्मलाताई काकडे महाविद्यालयाला अंतिम मान्यता
आबासाहेब काकडे यांनी १९६९ साली मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र त्यावेळी मान्यता मिळाली नाही. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजेच तब्बल ५२ वर्षांपासून आबासाहेब काकडे यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न नुकतेच ३१ ऑगस्ट रोजी मान्यता मिळाल्याने पूर्ण झाले आहे. विद्यार्थी वर्गामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे अद्ययावत स्वरूपाचे एकूण पाच हजार संख्येचे क्रमिक व संदर्भ पुस्तके, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांच्या सुसज्ज प्रयोगशाळा, दैनंदिन अध्ययनाबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, वाणिज्य शाखेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी टॅली कोर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयास मान्यता मिळवून देण्यासाठी ॲड. शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे, प्राचार्य लक्ष्मणराव बिटाळ, प्राचार्य डॉ. एम.के. फसले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
030921\img-20210903-wa0034.jpg
निर्लमाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय इमारत